मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने उद्या दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज्याच्या सद्यस्थितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली असून, पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
अलीकडील काळात महाराष्ट्र राज्यात, विशेषतः मराठवाडा, मुंबई, बीड, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, जालना, धुळे, नाशिक, नांदेड आणि धाराशिव यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार या बैठकीत पूरग्रस्तांना त्वरित मदत कशी देता येईल, यावर विचार करण्यात येणार आहे. यात मदत निधीची उपलब्धता, बाधित भागांमधील पुनर्वसन आणि भविष्यातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन यावर महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांना या बैठकीतून मोठ्या अपेक्षा आहेत.