म्हसवड (सातारा) प्रतिनिधी सचिन सरतापे तेज न्यूज
बारामती येथे नवरात्रोत्सवा निमित्त जयभवानी तरूण मित्र मंडळ अध्यक्षः ऋषिकेश (भैय्या) जगताप व संजीवनी क्लिनिक जामदार रोड, कसबा, बारामती यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर कालपासुन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी 45 रुग्णानी यांचा लाभ घेतला हे शिबीर पुढील पाच दिवस चालणार असुन शिबिराचा बारामतीतील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी क्लिनिकच्या संचालिका डॉ. ऋतुजा भोसले आणि जयभवानी तरुण मित्र मंडळाचे विध्यमान अध्यक्ष ऋषिकेश भैय्या जगताप यांनी केले आहे यां शिबिरास खास सहकार्य डॉ. संतोष भोसले यांचे लाभले.
हे शिबीर पुढील पाच दिवस चालू राहणार असून यां शिबिरासाठी तज्ञ डॉकटर तपासणी आणि मार्गदर्शन करणार असून बुधवार दि, २४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. अमोल भंडारी अस्थिरोग तज्ञ मोफत तपासणी, मोफत अस्थिरोग शस्त्रक्रिया
गुरूवार दि, २५ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. विकास बोरकर स्त्रिरोग तज्ञ मोफत आरोग्य तपासणी व सल्ला
शुक्रवार दि, २६ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. विराज गोफणे दंतरोग तज्ञ मोफत दंत तपासणी व उपचार
शनिवार दि, २७ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. गित दोशी फुफ्फुस रोग तज्ञ मोफत फुफ्फुसाची तपासणी व उपचार
रविवार दि, २८ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. अंजली सोरटे हृदयरोग व मधुमेह तज्ञ मोफत गरजेनुसार इ.सी.जी., रक्तदाब व साखर तपासणी
शिबिराची वेळ : रोज सायंकाळी ४ ते ९ सुचना : नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. संपर्क : संजीवनी क्लिनिक, जामदार रोड, बारामती मोबा. ९४०४२२०४३४
हे शिबीर केवळ मोफत तपासणी नव्हे, तर हजारो गरजूंसाठी सशक्त उपचार, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि मायेचा आधार ठरत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. शस्त्रक्रीया किंवा औषधोपचाराचा खर्च अलीकडे सर्वांच्याच आवाक्याबाहेर जात आहे. याचा गंभीर परिणाम रुग्णांवर होत असून आजही अनेक खेडोपाड्यात दुर्धर आजारांनी अनेक रुग्ण ग्रासलेले दिसून येत आहेत म्हणून यां शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा.
डॉ. ऋतुजा भोसले, संचालिका, संजीवनी क्लिनिक,बारामती

