सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व एस एस कलशेट्टी प्रतिष्ठान तर्फे सुमंगलाय लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार व सुमंगलाय लायन्स सर्जनशीलता व उपक्रमशीलता शाळा पुरस्कार 2025 संपन्न झाला.प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या मातोश्री सुमंगलादेवी कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तानाजी माने उपस्थित होते.प्रथमता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा ला.स्वामीनाथ कलशेट्टी,सचिन लायन दिनानाथ धुळम, कोषाध्यक्ष लायन सीए श्रेणिक शहा माजी प्रांतपाल लायन डॉ.गुलाबचंद शहा,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी तानाजी माने यांनी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे असे सांगितले.
यावेळी स्वामीनाथ कलशेट्टी यांनी आपल्या आईच्या प्रेरणेमुळे सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले.
याप्रसंगी सुमंगलाय लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्काराने डॉ श्रीरंग क्षिरसागर (प्राचार्य दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय), सौ स्मिता माळवदकर (नूमवि प्रशाला), प्रशांत नागुरे (एस जी प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक नागणसूर), सोमलिंग म्हमाणे (मल्लिकार्जुन प्रशाला बोरेंगाव) श्रीमती वैशाली कटारे (रोशन प्रशाला) या सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मोती माळ, लेखणी, देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी सुमंगलाय लायन्स सृर्जनशीलता व उपक्रमाशीलता शाळा पुरस्काराने शिवशरण खेडगी मुख्याध्यापक (एसव्हीसीएस कन्नड प्राथमिक शाळा), संजय साखरे मुख्याध्यापक (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगडगाव) सौ शुभांगी भडंगे मुख्याध्यापिका (लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी प्राथमिक शाळा),श्रीभगवंत उमदीकर मुख्याध्यापक(सहस्त्रार्जुन प्रशाला), सौ संगीता आडकी मुख्याध्यापिका(नीलकंठेश्वर प्रशाला), श्री संतोष हंपी मुख्याध्यापक (आसावा प्रशाला) या सर्व शाळांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मोतीमाळ,व लेखणी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कल्पेश उस्तुरगे यांनी केले तर आभार सचिव दिनानाथ धुळम यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी परिवार, लायन विठ्ठल सारंगी, लायन केदार स्वन्ने, लायन जयेंद्र नामा, सुनील अतनूरे,गुरु अवजे, आदर्श,काशीराज कोळी बिराजदार सर आदींचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम राष्ट्रीय गीताने करण्यात आले.

