पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तरेश्वर मुंढे यांना 'एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा 'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले करण्यात आले.
सोलापूर येथील हुतात्मा स्मृती सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या समारंभास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सांगोल्याचे शहाजी बापू पाटील,डॉ. अनिकेत देशमुख , जिल्हामाध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.मुंढे यांनी प्रशालेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेल्या विविध उपक्रमांची तसेच डिजिटल सुख सुविधांची आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव ॲड .वैभव टोमके,सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर ,ज्येष्ठ संचालक आप्पा चोपडे, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजय माळवदकर, सुनीता मोरे, उपमुख्याध्यापक दराडे व्हि.एस,विभाग प्रमुख व्ही.डी चौगुले, पर्यवेक्षक अशोक पवार, मधुकर भोसले ,मुख्य लिपिक हनुमंत मोरे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते,वसतीगृह अधीक्षक अमोल हुंगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले .

