सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनँशनल रिजन वन चे चेअरमन लायन ॲड. श्रीनिवास कटकुर आयोजित राज्यस्तरीय लायन्स शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲड. डॉ. प्रदीप सिंह राजपूत (जिल्हा सरकारी वकील DGP) व प्रा. डॉ.श्रीकांत येळेगावकर(प्रसिध्द साहित्यिक व मोटीवेशनल स्पिकर ) माजी प्रांतपाल डाँ. गुलाबचंद शहा व पीडीजी. अरविंद कोणशिरसगी हे उपस्थित होते. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ध्वजवंदन सचिव दिनानाथ धुळम व प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केले व या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे झोन चेअरमन ला. विनोद बुडूख, झोन चेअरमन ला.श्रीनिवास पुजारी,झोन चेअरमन ला मल्लिकार्जुन मसुती ,झोन चेअरमन ला. सोमशेखर भोगडे लायन राहुल दोशी, लायन. अतुल सोनिग्रा व माजी प्रांतपाल ला.अरविंद कोणसिरसगी व माजी प्रांतपाल लायन डॉ.गुलाबचंद शहा, लायन पदाधिकारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाल बुके सन्मानचिन्ह देऊन यथोचित रिजन चेअरमन अँड. श्रीनीवास कटकुर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथीचे शुभहस्ते सोळा पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार मोंमेटो, सर्टिफिकेट,शाल ,बुके देवुन सन्मान करण्यात आला व सरकारी वकील ॲड.डॉ.प्रदीपसिंह रजपूत म्हणाले की, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाने संदर्भ ग्रंथाचा,पुस्तकाचा अधिकाधिक वापर करून प्रभावी अध्यापन करावे.हे करत असताना विद्यार्थ्यांबद्दल आपलेपणा व समाजाप्रती आपल्यामध्ये आदर असावा.
याप्रसंगी दुसरे प्रमुख अतिथी प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी म्हणाले की शिक्षक हा अज्ञानाचा अंधकार दूर करून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रकाश देतो,यावेळी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे असे सांगितले. तर ॲड. रिजन चेअरमन लायन श्रीनिवास कटकुर यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले.
याप्रसंगी लायन्स इंटरनॅशनल रिजन वन टीचर अवार्ड या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने प्रा डॉ.श्रीनिवास इप्पलपल्ली, सौ.सुनीता स्वामीनाथ कलशेट्टी,प्रा.ॲड. सत्यनारायण माने,मुख्याध्यापक रिजवान शेख, प्रा.श्री किरण देशमुख, प्रा.केदार जत्ती, प्रा. नितीन पवार, प्रा.नारायण पाटील, प्रा.डॉ.मधुकर जक्कन, सौ.ममता बुगडे, सौ.संज्योती बिराजदार,सौ.उमा गोप,सौ.भक्ती रत्नपारखी,श्री.सुरेश डिसले ,सौ.सुनेत्रा मोहोळकर,सौ. माधवी अभ्यंकर या सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मोती माळ शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन रिजन कोऑर्डिनेटर ला.प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार लायन चंद्रकांत यादव यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.श्रीनिवास कटकुर मित्र परिवार, लायन चंद्रकांत यादव, लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी ,लायन श्रेणिक शहा, लायन केदार स्वन्ने, लायन पूनम शहा ,लायन राजू चौधरी ,लायन विठ्ठल सारंगी, लायन हरिहर महेंद्रकर ,लायन मल्लिकार्जुन उदगिरी ,लायन जयेंद्र नामा लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल मधील सर्व पदाधिकारी ,आदींचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम राष्ट्रीय गीताने करण्यात आले.

