श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या नियोजनाखाली संगीत कला रसिकांना सांगितिक मेजवानी
श्रीक्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाच्या सांगतेच गायनपुष्प ख्यातनाम गायक पं.विनायक थोरवी यांचे शिष्य किर्तीकुमार बडषेसी बेंगलोर यांनी गुंफल.
सुरुवातीला पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा, मेजर चंद्रकांत कोळी,संजय कोकीळ आणि कलावंतांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली.सुरुवातीला भिन्नषड्ज रागामध्ये दोन बंदिशी आणि तराणा सादर केला त्यानंतर जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने भक्तीमय वातावरण बनले आणि नंतर संतभार पंढरीत,सावळे सुंदर रूप मनोहर,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,अच्युतम केशवम ,भाग्यदा लक्ष्मी बारम्मा,आदी सुंदर अभंग सादर करत देव माझा मी देवाचा या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करत अप्रतिम स्वरांनी रसिकांना अक्षरक्ष: मंत्रमुग्ध केले आणि पंढरपूरकरांसाठी ही गानसेवा खास मेजवानी ठरली.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला अतुल ताडे हार्मोनियम वैभव केंगार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे सरांनी केले.यावेळी पंढरपूर कला रसिकांनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेतले.सर्व कलारसिक श्रोत्यांनी अप्रतिम सांगितिक मेजवानी दिल्याबद्दल मंदिर समितीचे मनापासून आभार व्यक्त केले.