पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे च्या विद्यार्थ्यांनी घालून दिला एक वेगळा आदर्श,'मदत नव्हे कर्तव्य'म्हणत केले भरघोस सहकार्य..
शेळवे, ता.पंढरपूर येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे च्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये एक नाविन्यपूर्ण आदर्श निर्माण करत माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना भरघोस आशी मदत केली. प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सीना नदीच्या पुराचे भीषण वास्तव सांगितले असता, विद्यार्थ्यांमध्ये तेथील आपल्याच बांधवांना मदत करण्याची भावना जागृत झाली, त्यांनी तेथील बांधवांना मदत करण्याचा मानस आपल्या शिक्षकांना बोलून दाखवला आणि मग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे ,संस्थापक सचिव अंकुश गाजरे तसेच संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी इयत्ता वाईज विद्यार्थ्यांना वेगवेगळे संसार उपयोगी साहित्य आणण्याचे आवाहन केले.
सांगितलेल्या साहित्यापेक्षाही जास्त साहित्य म्हणजेच चहा पावडर, साखर, तांदूळ, मीठ, रवा, वेगळ्या प्रकारच्या डाळी, स्वयंपाकाचे तेल, मसाला व उपवासाचे पदार्थ, पालेभाज्या-फळभाज्या, मिनरल वॉटरचे बॉक्स,गहू,आटा, मीठ, मसाले कांदा, लसूण, मिरची, तिखट बिस्कीटचे पुढे,असे सर्व प्रकारचे एक लाखाहून जास्त किंमतीचे साहित्य विद्यार्थ्यांनी जमा केले,काही दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांनी त्यामध्ये अजून भर टाकली, सर्व साहित्यांचे वेगवेगळे असे प्रत्येकी पाच किलोचे किट करण्यात आले. अशी 300 हून अधिक किट माढा येतील सीना नदीच्या पुराचा सर्वात जास्त फटका बसलेल्या केवड आणि उंदरगाव या ठिकाणी मदतीसाठी पाठवण्यात आले.
कालच माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी अतिशय आर्त विनवणी केली होती की माढा मतदारसंघातील पूर बाधित 15 ते 16 गावांना आपल्या मदतीची खूप आवश्यकता आहे आणि त्यानुसार सनराईज पब्लिक स्कूल शेळवेच्या बालचमुंनी आणि प्रशासनाने आपली सर्वात पहिली मदत मदत उंदरगाव आणि केवड या ठिकाणी पोहोचवली तेथील परिस्थिती अत्यंत बिकट होती असंख्य लोकांचे संसार उघड्यावर पडलेले होते.माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील स्वतः जातीने तेथील घरोघरी फिरून पूर परिस्थितीचा आणि नुकसाणीच्या तीव्रतेचा आढावा घेत होते.
त्यांच्यासह सनराईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, संस्थापक सचिव अंकुश गाजरे, शेळवे गावचे सरपंच अनिल ज्ञानोबा गाजरे,उपसरपंच किरण देवचंद गाजरे,शंकर शिंदे,सनराईज ऑफसेट चे समाधान गाजरे, संतोष आत्माराम गाजरे,दीपक लोकरे,सुरज गाजरे,सागर गाजरे,ऋषिकेश गाजरे, बालाजी गाजरे, निखिल आसबे,अक्षय गाजरे व मित्रपरिवार यांच्या हस्ते अन्नधान्याच्या किटचे गरजू लोकांना वाटप करण्यात आले,
ऐनवेळी शेळवे गावचे युवा नेते संतोष तुकाराम गाजरे यांनी, हे सर्व साहित्य आवश्यक ठिकाणी पोहचवण्यासाठी स्वतःच्या पिक अप ची व्यवस्था करून दिली,खरंतर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची,आपलेपणाची,संवेदनशीलतेची मूल्ये रुजावीत म्हणून प्रशालेने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे अत्यंत यशस्वीपणे पार पडला..
यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन 'मदत नव्हे तर कर्तव्य', हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली..!!

