श्रीक्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाच दुसरं स्वरपुष्प आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक भारतरत्न स्वरभास्कर पं.भिमसेन जोशी यांचे शिष्य पं.आनंद भाटे यांच्या स्वरांनी गुंफली.सुरुवातीला सदस्या शकुंतला नडगिरे पं.आनंद भाटे, सुयोग कुंडलकर,पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा,संजय कोकीळ यांचे शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली.
सुरुवातीला आनंद भाटे यांनी राग पुरीया कल्याण गात गुरु भिमसेन जोशी यांच्या दमदार स्वरांची आठवण करत त्यांनी अजरामर केलेल्या अभंगांची आणि नाट्यगीतांची त्यामध्ये वारकरी बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत रुप पाहता वद जाऊ कुणाला शरण,लोचणी,माझे माहेर पंढरी,जोहार मायबाप जोहार,मेजवानी पंढरपूरकरांसाठी खास मेजवानीच ठरली कार्यक्रमाची सांगता चिन्मया सकल ह्रदयाने करत रसिकांंसाठी ही मैफिल अविस्मरणीय ठरवली.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला प्रसाद करंबेळकर हार्मोनियम सुयोग कुंडलकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.सुत्रसंचनलन बापू सावळे सरांनी केले.यावेळी पंढरपूर कला रसिकांनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.आभार राजेंश खिस्ते यांनी मानले.
पुढे २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवास उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात आले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत

