वेणुनगर, पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३०.०९.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे शुभहस्ते करण्यात आले.
तसेच श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२५-२६ गळीत हंगामाचा ४४ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभमंगळवार दिनांक ३०.०९.२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता या शुभसमयी ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज चवरे यांचे शुभहस्ते व होमहवन पुजन कारखान्याचे संचालक श्री सचिन सोपान वाघाटे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सिमा सचिन बाघाटे व श्री समाधान तुकाराम गाजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी समाधान गाजरे व कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
याप्रसंगी ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज चवरे हे आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की, कै. औदुंबरआण्णा पाटील यांचे कार्यकाळामध्ये स्वतःचे निधीमधून ऊसबिलाचे वाटप करणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना होता, त्याचा धरतीवर विद्यमान चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांचे काम चालू आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे ते म्हणाले व पुढील गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.
कारखान्याचे कार्यलक्षी संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले. कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे यांनी श्रध्दाजंलीचा ठराव मांडला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक, श्री डी. आर. गायकवाड यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी व हात उंचावून मंजूरी दिली.
कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांनी सन २०२४-२५ हंगामाचा अहवाल सादर करुन या हंगामात ८९ दिवसात ६,१९,३०५ मे. टन ऊसाचे गाळप होऊन ६,४६,२७५ क्विंटल साखरेचे उत्पादन होवुन सरात्तरी साखर उतारा १०.७५ टक्के इतका मिळाला आहे. गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला आजवर रू.२८०३/- प्र.मे.टन प्रमाणे रक्कम अदा केली असून, जाहिर केलेल्या रु.३५००/- प्र.मे.टन या दराला कसल्याही मुळया फुटु देणार नाही असे बोलून रुपये २००/ प्र.मे.टन याप्रमाणे दुसरा हप्ता दिपावली सणानिमित्त सभासद शेतकऱ्यांना अदा करणेचा निर्णय जाहिर केला. दिलेल्या आश्वासना प्रमाणे उर्वरीत रक्कम टप्प्या टप्याने देणार आहोत, तर मागील तीनही वर्षामध्ये एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिल्यामुळेही तोटा सहन करावा लागला आहे हे त्यांनी नमुद केले. तसेच सन २०२४-२५ मधील आसवणी, सहवीज निर्मिती प्रकल्पाचे माध्यमातुन झालेले उत्पादन व विक्रीचा अहवाल सभासदांसमारे मांडण्यात आला.
गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखान्याचे कार्यक्षेत्रामधून ५४,०६३ एकर ऊसाची नोंद झालेली असुन त्यापासुन अंदाजे १८ ते २० लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल. या गळीत हंगामामध्ये आपणाकडे असलेल्या दोन्ही मिल चालू करुन व आधुनिक पध्दतीची मशिनरी बसविल्यामुळे जास्तीत जास्त क्षमतेने गाळप होणार आहे. नोंदलेल्या ऊसाचे गाळप वेळेत पार पाडणेसाठी कारखान्याने पुरेशी ऊस तोड यंत्रणा उभी केलेली आहे.
कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सांगीतले की, एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांचेकडे आपल्या कारखान्याने ३७२.८४ कोटीचा कर्ज प्रस्ताव दाखल केला, मात्र रूपये ३४७.६७ कोटी रक्कम मंजूर केली व एन.सी.डी.सी.नवी दिल्ली यांनी रक्कम रू. ८०.०८ कोटी जुने कर्ज व व्याजापोटी कपात करून रु.२६७,५९ कोटी देण्यात आले. सदर कर्जामधील पहिला टप्पा २१९.५४ कोटी व दुसरा टप्पा ४८.०५ कोटी याप्रमाणे मिळाला. अशाप्रकारे प्रत्यक्षात आपले कारखान्याचे मागणी प्रस्तावापेक्षा १०५ कोटी कमी मिळाले. त्यामूळे धरलेली कामे व जुनी देणी देणे शक्य नव्हते. यापेक्षा कारखाना दुरुस्तीची कामे करून गाळप वाढविणे, तोडणी वाहतुकीसाठी अॅडव्हान्स देणे गरजेचे होते. याच दरम्यान सदर कर्ज योजनेमध्ये शासनाने प्रथम प्राप्त कर्जातून पुर्वीची जुनी देणे देणेबाबत असलेली तरतुद काढून टाकत नवीन काम करणेसही मंजूरी दिली. त्यामुळे कारखान्याचे हित समोर ठेवून प्राधान्याने आलेल्या कर्जाचा विनियोग करणेत आला, केलेल्या विनियोगाचा प्रस्ताव राज्य शासनास मा. साखर आयुक्तामार्फत सादर करणेत आला, सादर विनियोगाचे लेखापरिक्षण अहवाल होवून सुधारित विनियोगास राज्य सरकारने मंजुरी ही दिली. त्यानुसारच खर्च झालेला असून एनसीडीसीने कपात केलेली रक्कम रू.८०.०८ कोटी वजा जाता कारखान्यास प्रत्यक्षात मिळालेली रक्कम रू.२६७.५९ कोटीचे विनियोगाची तपशिलवार माहिती सभेमध्ये उपस्थितांना देण्यात आली. त्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
यंत्रसामुग्री नुतनीकरण दुरुस्ती करणेसाठी आजवर रु.७६.९१ कोटी एवढा खर्च झाला आहे. तर येणारे गळीत हंगाम २०२५-२६ हंगाम पुर्व नियोजनामध्ये ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा अॅडव्हान्स, कामगार पगार करिता रु.५९.५९ कोटी व मागील संचालक मंडळाच्या काळातील थकीत देण्यापोटी आजवर रू.१७५.८२ कोटी अदा केलेले आहेत. असा एकत्रितपणे `रु.३१२.३२ कोटी खर्च झाला आहे. झालेला खर्च सभेसमोर वाचून दाखविण्यात आला, त्यास सभेने संमती दिली.
मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांव्दारे आपला कारखाना व कारखान्याचे संचालक मंडळाची बदनामी करण्याचा प्रयत्न काही कारखाना विरोधी भूमीका असणाऱ्या पैन्यगैन्ऱ्यांकडून केला जात आहे. अशा प्रवृतीच्या लोकांना कारखाना सभासद त्यांची योग्य जागा दाखवतील याची मला खात्री आहे. विठ्ठल परिवारातील सदस्यांनी याचा विचार करून कारखान्याच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. आज कारखान्याचे सभासदां समोर सर्व लेखाजोखा मांडला व नमुद केले की, आपले कारखान्यास शासनाचे एनसीडीसीकडुन अनुदान मिळालेले नसून ते कर्ज आहे व ती फेडण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असून त्यासाठी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याचे आर्थिक नियोजन व विकास यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सभेमध्ये उपस्थित सभासदांनी मागील काळातील व्यापारी व इतर संदिग्ध असून देणी देणेबाबत साखर आयुक्त यांचेमार्फत विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक करुन सदर लेखापरीक्षणाच्या अहवाला अंती मंजूरी नुसारच देणी अदा करावीत असा प्रश्न उपस्थित केला असता त्यास उपस्थित सभासदांनी एकमतांनी मंजूरी दिली असून याविषयी वार्षिक सभेमध्ये ठराव पारित केला गेला.
आपले कारखान्याचे आसवनी प्रकल्पामध्ये सुधारणा करुन १०० के. एल.पी.डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरु करणार आहोत. ग्रेनबेस इथेनॉलला साधारण ७२ रुपये प्रति लिटर दर मिळतो तर सिरप बेस इथेनॉलला ६५ रुपये प्रति लिटरचा दर मिळतो, सदर दरामध्ये तफावत असून सिरप बेस इथेनॉलला सुध्दा ७२ रूपये प्रति लिटरचा दर मिळणे गरजेचे आहे. याबाबत सरकारला पत्र देवून अधिवेशनात मागणी केली आहे. तसेच आपल्या कारखान्याच्या आजचे वार्षिक सभेत सर्वांनुमते झालेला ठरावही शासनास प्रस्तावासह सादर करावा. केंद्र शासनाचे धोरणामध्ये साखरेची किंमत कमी व ऊसाची किंमत जास्त अशी तफावत असले कारणाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. याकरिता वार्षिक सभेच्या निमित्ताने ठराव करुन साखरेचे किमान विक्री मुल्य (एम.एस.पी.) वाढविणेबाबत शासन दरबारी पत्र व्यवहार करावा, असेही त्यांनी नमुद केले.
कारखान्याचे मागील संचालक मंडळाने कारखाना सभासद, ऊस वाहतूक ठेकेदार व कामगार यांचे नावावर २०१६-१७ मध्ये एकूण ८४३ लोकांच्या नावावर रक्कम रु.५८.१९ कोटी कर्ज घेतले होते, रक्कम थकीत होऊन व्याजासह रु.७१.७० कोटी एवढे झाले. सदर प्रकरणी संचालक मंडळाने ओ.टी.एस. करुन रु.३३.०० कोटी अदा करणेचे ठरविले. वेळेवर हप्ते न भरलेमुळे बँकेने रु.९४.३० लाख दंड व्याज व कायदेशीर खर्च रु.२७८.४८ लाख एवढी मागणी केली व सर्व खाते धारकांवर कोर्ट केस केली. यामुळे सर्व खातेधारकांचे सिबील बंद पडून त्यांचे वैयक्तीक व्यवहारांसाठी अडचण निर्माण झाली होती. बँकेने ओटीएस रद्द करून कोर्टाच्या माध्यमातून मुळ पुर्ण रकमेवर वसुलीची प्रक्रिया सुरु केली होती. सदर प्रकरणी बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन रु.५०.०० लाखामध्ये ओ.टी.एस. पुर्ण केले, असे दिसत असले तरी रक्कम रु.८०.०८ कोटी एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांना व्याजासह मोजावे लागले आहेत. एवढेच नव्हे तर तत्कालिन संचालक मंडळाने एन.सी.डी.सी.ची फसवणूक करुन कर्जाची परतफेड न केल्यामुळे कारखाना व बँक विरोधातील दिल्ली डी.आर.टी. न्यायालयातील प्रकरणही काढावे लागले. कारण आपल्याला अडकलेले सभासद शेतकरी मोकळे करणे महत्वाचे होते. तरी टिकाकारांनी अंर्तमुख होवून विचार करणे गरजेचे आहे.
सीना व भिमा नदीस महापुर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत, शासकीय कर्मचारी जाणूनबूजन आडकाटी करत असतील तर माझ्याशी संपर्क करावा. तसेच माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावांना जास्तीत जास्त मदत करणेचे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
या सभेसाठी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बब्रुवाहन रोंगेसर, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती खटके, सौ. सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे, एम.एस.सी. बँकेचे प्रतिनिधी सी.एस. पाटील, मोठ्या संख्येने कारखान्याचे माजी संचालक, सभासद, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सर्व उपस्थित सभासदांचे निमंत्रीत संचालक श्री सचिन शिंदे-पाटील यांनी आभार मानले व सुत्रसंचलन प्रा. नागटिळक सर यांनी केले.