भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार शिरोमणी स्व्.वसंतराव (दादा) काळे यांच्या आशिर्वादाने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची वाटचाल यशस्वीरित्या चालु असून, कारखाना कार्यस्थळावरील कामगार श्रीगणेशोस्तव मंडळाचेवतीने कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य् साधुन अनंतचतुदर्शी निमित्त चेअरमन कल्याणराव काळे व त्यांच्या सुविद्या पत्नी संगिताताई काळे या उभयतांच्या शुभहस्ते श्रीसत्यनारायण महापुजा संपन्न झाली.
यावेळी चेअरमन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त् कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर व सर्व संचालक मंडळ यांच्यावतीने वृक्षारोपन व वसंतदादा मेडिकल फौंडशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर यांचेवतीने मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर घेण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर सुमारे 300 रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले.
तसेच डॉ.सुधिर शिनगारे, आस्थीरो तज्ञ डॉ.आनंद कुलकर्णी, फिजीशियन डॉ.सुरज गायकवाड, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी सौ.जयश्री शिनगारे, डॉ.अमृता म्हेत्रे, माधुरी शिंदे, सुरज रजपूत, संचिता वाघमारे व जनकल्याण हॉस्पीटलचा सर्व स्टाफ यांनी नाव नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केले. या शिबीरामध्ये कारखाना परिसरातील आसपासचे रहिवाशी, कारखाना कॉलनीतील कामगार व त्यांचे कुंटुंबीयांनी लाभ घेतला. या मोफत आरोग्य शिबीरामुळे अनेक गरजुना मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. यामुळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे कार्याची स्तुती करुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि अशीच समाजसेवा आपणाकडून सतत घडत रहो अशी अपेक्ष व्यक्त् करुन चेअरमन कल्याणराव काळे यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.
यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, जयसिंह देशमुख, अमोल माने, राजाभाऊ जगदाळे, संतोष भोसले, जोतीराम पोरे, परमेश्वर लामकाने, अरुण नलवडे, बाळु माने, सुनिल सराटे, विक्रम बागल, सौ.उषाताई माने, पंचायत समिती सदस्य् सुरेश देठे तोडणी वाहतुक ठेकेदार धनाजी कवडे, बगॅस ठेकेदार रामचंद्र कौलगे, आदी आजी माजी संचालक तसेच प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद शेतकरी, उपस्थित होते.

