पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि ETELSA क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “आयओटी आणि मशीन लर्निंगमधील उदयोन्मुख करिअर मार्ग: कौशल्ये, भूमिका आणि भविष्यातील कल” या विषयावर व्याख्यान चे आयोजन तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
हे व्याख्यान श्री रोहित अभियांत्रिकी फर्म प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील उद्योग संसाधन व्यक्ती श्री. रोहित दनके यांनी दिले. हे व्याख्यान प्रा. एस. एस. गंगोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या व्याख्यानात तज्ज्ञांनी आयओटीमधील प्रमुख तंत्रज्ञान ट्रेंडमध्ये 5G-संचालित आयओटी, एज कंप्युटिंग, एआय-चालित आयओटी अॅप्लिकेशन्स, डिजिटल ट्विन्स, आयओटी सुरक्षेसाठी ब्लॉकचेन, स्मार्ट शहरे, आयओटी-वर्धित आरोग्यसेवा, व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड आयओटी डिव्हाइसेस, आयओटी सुरक्षा आणि आयओटीसह मेटाव्हर्स इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. आयओटी एक असे जग सक्षम करते जिथे सर्वकाही संगणक नेटवर्क आणि सेन्सर्सद्वारे जोडलेले असते. IoT डिव्हाइसेस, बायोमेडिकल सिस्टीम, रोबोटिक्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये त्याचा कसा वापर होतो हेही सांगितले.
आयओटी एप्लीकेशन्स मध्ये मशीन लर्निंग आणल्याने बँडविड्थ आवश्यकता कमी होतात, वीज वाचते आणि स्मार्ट निर्णय घेण्याची डिव्हाइसची क्षमता वाढते. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) मध्ये उद्योगांमध्ये परिवर्तन करण्याची आणि व्यवसाय प्रक्रिया आधुनिकीकरण करण्याची क्षमता आहे. ते सध्याच्या युगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञानांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या विषयावर आधारित असणाऱ्या भविष्यातील संधी कोणत्या कंपनीत आहेत त्या विषयाची सखोल माहिती देण्यात आली , जसे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड , के पी आय टी टेक्नॉलॉजी, एल अँड टी टेक्नॉलॉजी, ऍक्लिव्हिस टेक्नॉलॉजीज, डीप सी इलेक्ट्रॉनिक्सअशा असंख्य कंपन्या मध्ये रोजगारांची संधी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व विभागप्रमुखांनी तज्ज्ञांचे आभार मानले. अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना संशोधन व करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात १०९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. व्याख्यानच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

