पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची नुकतीच कार्यकारिणी प्रसिद्ध झाली. यावेळी डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे यापूर्वी कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवडीनंतर मोहिते पाटील यांच्यावर सर्वच स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोहिते पाटील यांच्या निवडीनंतर इंदापूर तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्षाकडून अकलूज ( ता. माळशिरस ) येथे नुकताच डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचा प्रतापगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, तालुका समन्वयक अरुण पवार, उपतालुका प्रमुख संदीप चौधरी यांच्यासह धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी शिवसेना तालुका संघटक तथा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुदर्शन रणवरे उपस्थित होते. मोहिते पाटील यांनी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्याशी मनमोकळा संवाद साधत इंदापूर तालुक्यात करत असलेल्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले.
डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही जनसेवा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय काळे, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, माजी तालुकाप्रमुख ॲड नितीन कदम इत्यादी ठाकरे शिवसेनेचे इंदापूर मधील नेत्यांचेही डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी स्नेहाचे व जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत.

