भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर भाळवणी येथे चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे यांच्या 52 वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला . यावेळी विविध कार्यक्रमाने संपन्न झाले.
या वेळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेचे जेष्ठ सहशिक्षक एस.एम.चौगुले यांनी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.यानंतर दिनांक ०३/०९/२०२५ वार बुधवार रोजी प्रशालेत विविध शालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत प्रथम ,द्वितीय , तृतिय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना शालेय साहित्य बक्षिस म्हणून देण्यात आले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या नंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थांना प्रशालेतर्फे चेअरमन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट अशाप्रकारची भोजन व्यवस्था करण्यात आली.
यावेळी सदर कार्यक्रम मार्गदर्शक बाळासाहेब काळे गुरूजी, प्रशालेचे सचिव एच.आर.जमदाडे , प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला..
यावेळी प्रशालेचे सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक आय.एन.शेख यांनी केले तर आभार सहशिक्षक एन.एस.जाधव यांनी व्यक्त केले.

