सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शेळगी येथील सन्मित्र नगरामध्ये श्री सिद्धीविनायक देवस्थान मंदिर असून,परिसरातील असंख्य भक्तगणांच्या तन -मन -धन सहकार्याने व श्री बृहन्मठ होटगी मठाचे बृहन्मठाध्यक्ष परमपूज्य तपोरत्नम श्री.योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते,दिव्य सानिध्यात सन 10 मे 1998 मध्ये स्थापना झाली,श्री सिद्धीविनायकाची मूर्ती काळा पाषाणातील आखीव- रेखीव,सुंदर नयन मनोहर,करुणामय,भक्तांचे संकट दूर करणारी अशीच आहे.
आज 27 वर्षे झाली असून शेळगी परिसरातील सर्वात मोठे गणपती मंदिर व भक्तगणांच्या नवसाला पावणारा जागृत सिद्धीविनायक देवता अशी सर्वदूर ख्याती आहे.
या मंदिरात वर्षभरातून गणेश जयंती व गणेश चतुर्थी निमित्त सन्मित्र नगरातून *श्रीची सवाद्य पालखी मिरवणूक* मोठ्या भक्तीमय वातावरणात निघत असते.याशिवाय वर्षभरातून संकष्ट चतुर्थी,अंगारक चतुर्थी, मोठ्या उत्साहात साजरी होत असते.
यावर्षी बुधवार दिनांक 27 ऑगस्ट पासून ते शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी या अकरा दिवसापर्यंत वेदमूर्ती ईश्वरशास्त्री होळीमठ यांच्या वैदीकत्वाखाली श्रीची अभिषेक,राजोपचार पूजा, व गणेशयाग यज्ञाचे दांपत्यासह आयोजन करण्यात आले होते.या अकरा दिवसात पुष्पालंकार, रक्तचंदनलेपन,दुर्वालंकार, तिरंगालंकार, हरिद्रालेपन भाजीपालाअलंकार,भस्मलेप- -नालंकार,फळालंकार, 56 भोग सहित रिद्धी -सिद्धी अलंकार,व आज अनंत चतुर्दशी निमित्त सकाळी राजोपचार महापूजा नंतर गणेशयाग पूर्णाहूती व अभिषेक जडगे यांच्याकडून महाप्रसादाची सोय करण्यात आलेली होती.शेळगी परिसरातील सन्मित्र नगरातील सर्व गणेशभक्तांनीं युवकवर्ग, बालगोपाळ,असंख्य भक्तगणं इत्यादीनीं याचा लाभ घेतला.
याप्रसंगी श्रीचरणी चांदीची प्रभावळ समर्पण केल्याबद्दल विजापूरचे सद्भक्त सचिन मल्लिकार्जुन कल्लूर व रवी कल्लूर या दानशूर मान्यवरांचे शाल हार श्रीफळासह सत्कारकरण्यात आले.याप्रसंगी वे.मु.ईश्वर होळीमठ शास्त्री सह इतर वैदिकवृंदाचे दक्षिणा देऊन सत्कार करण्यात आले व या अकरा दिवसात श्रीसेवा, भजनसेवा, समर्पित भक्तांचेहीं यथोचित सत्कार करण्यात आले.अकरा दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी वडीलधारी माता-पिता,श्री.सिद्धीविनायक महिला भजन मंडळ,बालगोपाळ व युवकवर्गानी या कार्यक्रमात तन-मनं-धनाने सहभागी झाले.
वरील सर्वच कार्यक्रमासाठी सन्मित्र नगरातील,माता-पिता, वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, गणेशभक्त व युवकवर्गानचे बहुमोल सहकार्य लाभले.श्री. सिद्धीविनायक देवस्थान वतीने सर्वच भक्तगणांचे हार्दिक आभार मानण्यात आले.

