पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट यांनी ग्रामीण भागातील पोलीस पाटील व ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी रेखा घनवट म्हणाल्या की या बैठकीत गणेश उत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबवावेत यामध्ये लहान मुलांसाठी व मुलींसाठी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच वृक्षारोपण ही मंडळांनी करावे तसेच कोठेही शांततेचा भंग होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी असे सूचित केले तसेच विसर्जना वेळेस नो डॉल्बी नो डीजे नो लाईट्स नो लेझर हा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा असेही सूचित केले त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन हे पारंपारिक साधेपणाने करावे तसेच नदीकाठी गणपती विसर्जना वेळेस लहान मुलांना पाण्यापासून दूर ठेवावे अशी सूचना करण्यात आली.
या बैठकीसाठी पीएसआय वीरसेन पाटील पीएसआय अनिल पाटील पीएसआय ज्योती बनवाड शेळवे पोलीस पाटील नवनाथ पाटील धोंडेवाडी पोलीस पाटील नितीन देठे पाटील वाडीकुरोली चे अमर काळे पाटील पिराची कुरोलीचे शरद कौलगे पाटील जैनवाडी चे पोलीस पाटील स्मिता दानोळी गार्डीचे सोमनाथ निंबाळकर उंबरगाव बोहाळी पळशी सुपली वाखरी सोनके कोर्टी लोणारवाडी तसेच ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

