इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना, उद्योग-व्यवसाय, साहित्यकला, विज्ञान-तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights - IPR) यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. संशोधकांनी आपल्या संशोधनातून निर्माण झालेल्या नवीन कल्पना, तांत्रिक शोध, साहित्यकृती, कलाकृती यांचे हक्क कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब- वालचंदनगर येथील भूगोल विभागाच्या वतीने बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट संशोधकांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी मूलभूत माहिती देणे, त्याचे विविध प्रकार समजावून सांगणे तसेच पेटंट अर्जाची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी केली जाते याची माहिती देणे होते.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी भूषविले. कार्यशाळेत दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते . प्रथम सत्रास बारामाती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील,सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन कुलकर्णी व द्वितीय सत्रास डॉ. विजय मोहिते प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते म्हणुन लाभले.
कार्यशाळेत प्रथम सत्रात बौद्धिक संपदा हक्क
विषय माहिती देताना डॉ. सचिन कुलकर्णी यांनी बौद्धिक संपदा हक्क,प्रकार ,पेटंट (Patent कॉपीराइट Copyright),ट्रेडमार्क (Trademark),औद्योगिक रचना (Industrial Designs),भौगोलिक चिन्हे (Geographical Indications),संशोधन क्षेत्रातील बौद्धिक संपदेचे महत्त्व, संशोधकांनी नावीन्यपूर्ण कल्पना सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी सांगितली.
दुसऱ्या सत्रात डॉ. विजय मोहिते यांनी पेटंट अर्जाची प्रत्यक्ष प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केली. या सत्रात त्यांनी पुढील गोष्टींवर मार्गदर्शन केले .पेटंटसाठी अर्ज करण्याची पात्रता
पेटंट अर्जाची मूलभूत पायरी,ड्राफ्टिंग करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी,अर्ज करताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका,पेटंट नोंदणीचे फायदे,संशोधकांनी पेटंट प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे उपाय,प्रत्यक्ष जीवनातील काही पेटंटचे उदाहरणे मांडून संकल्पना स्पष्ट केली.प्राध्यापकांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी माहिती मिळाली.कार्यशाळेमुळे संशोधक वृत्ती विकसित होऊन ज्ञाननिर्मिती व नावीन्यपूर्णता यांना चालना मिळेल संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांचे मार्गदर्शन लाभले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र पाखरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तेजश्री हुंबे व आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. योगेश खरात यांनी केले.

