सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी -१, रिजन १, झोन - ५ पहिली झोन अव्हायझरी मिंटीग हॉटेल ग्रीन धुड रिसॉर्ट सोरेगाव विजापूर रोड, सोलापूर येथे झोन चेअरमन लायन सोमशेखर ईरप्पा भोगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
झोन चेअरमन यांनी त्यांच्या तिन्ही लायन्स क्लबला लायन सदस्य वाढवावे.आणि लायन्स सेवा कार्याचा सचिवा कडून अहवाल घेतला. लायन्स पदाधिकारी यांनी त्यांना अनेक अडचणी विचारले असता लायन सोमशेखर भोगडे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. आणि मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या पावसाने लोकांचे आणि शेतीचे पिके नुकसान झाले. याविषयी विचार विनिमय झाले.
डिस्टिकचे प्रांतपाल लायन डॉ विरेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाकार्य चालू आहेत रिजन १, झोन ५ चे गायडींग मेंबर एम जे एफ लायन प्रब्बुदचंद्र झपके सर, लायन डॉ नारायण दास चंडक माजी प्रांतपाल गण आहेत. यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्षा डॉ सौ लायन कॄष्णा राहुल चंडक, लायन्स क्लब व्टिन सिटीचे सचिवा,कॅबिनेट ऑफिसर लायन सौ नंदिनी जाधव, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, कॅबिनेट ऑफिसर एम.जे.एफ लायन डॉ राहुल ना. चंंडक, लायन मुकुंद जाधव, लायन रविकिरण वायचळ, झोन सचिव लायन नागेश बुगडे, एम जे एफ लायन सौ ममता बुगडे,लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो क्लबचे अध्यक्ष लायन विश्वनाथ आवटे, सचिव लायन विश्वनाथ आमणे, लायन्स क्लब ऑफ सांगोला चे अध्यक्ष लायन नावनाथ बंडगर, सचिव लायन सुर्यकांत कांबळे, खजिनदार लायन म्हमाणे आणि कॅबिनेट ऑफिसर उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन झोन सचिव लायन नागेश बुगडे यांनी केले.

