भाळवणीत प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री अकॅडमी येथे एलआयसी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसी चे विकास अधिकारी बी.एस चौगुले हे होते.
यावेळी ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत देशपांडे, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, डॉक्टर नवनाथ खांडेकर,प्रा. डी एस माळवदे,ग्राहक पंचायतचे शहाजी जाधव, यशश्री अकॅडमीचे प्रवीण लिंगडे ,बाळासाहेब कापसे, प्रशांत माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शशिकांत हरिदास म्हणाले की आई वडिलांच्या नंतर शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो. शिक्षकांचा आदर्श कायम विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे. समाजात शिक्षक हे त्या विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचे उत्तम कार्य करतात त्यामुळे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा देऊन गौरव करणे उचित आहे असे हरिदास म्हणाले. जी
यावेळी यशश्री अकॅडमी मधील शिक्षक संजय भुसे, योगेश कस्तुरे,आशिष जोशी,राजवर्धन देठे,शिक्षिका गौरी लिंगडे,सोनाली मदने,प्रियांका पिसे, प्रगती दानोळे,मेघा येलमर यांचा शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती माळवदे यांनी केले तरी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची माळवदे यांनी केले तर आभार शिक्षक रणजितसिंह लोखंडे यांनी मानले.या कार्यक्रमास महिला विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

