पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचा कार्यालयात ६९ वा वर्धापनदिना निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगिनी कुलकर्णी,(प्रशासन अधिकारी),संजय कोकरे (स.प्रशासन अधिकारी) तसेच गोपिसंतोषे, ग्यानेंद्र शर्मा, सुरेश कुंभार, मकरंद अभंगराव,सौ.अश्विनी बिराजदार,अधिकारी,कर्मचारी यांना शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका सदस्य रामदास गव्हाणे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शशिकांत हरिदास म्हणाले की एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India), जी भारत सरकारची एक मोठी सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसी लोकांकडून विमा हप्ते गोळा करून, त्या पैशांची गुंतवणूक करते आणि लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध जीवन विमा योजना आणि गुंतवणूक पर्याय देते.देशाच्या विकासामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे.अनेक विकासाच्या योजना त्यामुळे पुर्णत्वास जात आहेत. हे भारतातील सर्वात मोठे जीवन विमा महामंडळ आहे, जे लोकांना आर्थिक सुरक्षा आणि गुंतवणूक पर्याय प्रदान करते. असे हरिदास म्हणाले.
यावेळी अश्विनी बिराजदार यांनी सर्वांचे आभार मानले.

