पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज महाराजा स्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करणे बाबत बैठक घेण्यात आली.
विवाद ग्रस्त अविवाद ग्रस्त नोंदी निर्गत करणे बाबत. त्याबाबत कॅम्प राबवून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत विवाद ग्रस्त नोंदी 10% वर अविवाद ग्रस्त नोंदी 0.5% वर आणणे .
गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तेथे बक्षीस पत्र वा ग्रामपंचायत मार्फत खाजगी जागा अथवा असल्यास शासकीय जागा उपलब्ध करून देणे.
विविध जातीचे प्रलंबित प्रमाणपत्र वाटप करणे. कुणबी जातीच्या नोंदी शोधणे. अनुकंप भरतीची कार्यवाही करणे. Vjnt जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी कॅम्प आयोजित करणे. आयुष्यमान भारत कार्ड वाटप कॅम्प आयोजित करणे.गावोगावी अस्तित्वात असलेले रस्त्यांच्या नोंदी घेणे.
यावेळी उपस्थित पंढरपूर आणि मंगळवेढा चे प्रांताधिकारी तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा चे तहसीलदार पंढरपूर आणि मंगळवेढा चे गट विकास अधिकारी उपस्थित होते.

