पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उजनी धरणातून आज दि २७ सप्टेंबर २०२५ रोजी सांडव्यातून ९० हजार क्यूसेक्स व विद्युत गृहातून १६०० क्यसेक्स विसर्ग असा एकूण ९१ हजार ६०० क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार असून भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे ,आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीच्या काठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठी, नदीच्या पाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी, पंढरपूर तालुक्यातील नदीकाठी असणा-या गावातील नदीपात्रालगत राहणा-या रहिवासी/नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत, तात्काळ त्यांचे सर्व आवश्यक वस्तु-पशुधनासहीत सुरक्षित स्थळी स्थलांतरीत कराव्यात. तसेच त्यांना सुरक्षित स्थळी-आवश्यक्तेनुसार तात्पुरत्या निवारास्थळांचा शोध घेवून स्थलांतर करुन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठी पुर परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी असे आवाहनही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

