पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्व. सर्जेराव आण्णा खिलारे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सर्व गोर-गरीब बहुजन, समाजातील घटक एकत्र घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेऊन काम करणे, त्यांचा सर्व क्षेत्रांमध्ये मोठा खारीचा वाटा होता.
भाऊची समाजाप्रती तळमळीने काम करण्याची आवड होती. त्यांना असे वाटे की समाजातील सर्व लहान मुलांपासून ते तरुणांनी मोठे व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे, गावाचे नांव उज्ज्वल करावे. स्वः सर्जेराव खिलारे यांनी शेती च्च्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत होते.
स्व. सर्जेराव भाऊचा स्वभाव मनमिळावू व सर्वांशी हसत खेळत प्रामाणिकपणे आपले विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याची काम करत. स्वः सर्जेराव आण्णा खिलारे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर , बिईग ह्युमन बेवारस सामाजिक संस्था गादेगाव येथे फळे वाटप अन्नभोजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या पत्रकार सचिन कुलकर्णी पत्रकार तानाजी जाधव पत्रकार नामदेव लकडे अजित देशपांडे कल्याण कुलकर्णी. दी मान्यवर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भाऊच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी भाऊना अभिवादन करतांना उपस्थित श्रीमती. सजाबाई खिलारे, राजेश सर्जेराव खिलारे, सौ सुवर्णा राजेश खिलारे, आकाश राजेश खिलारे, नवनाथ सर्जेराव खिलारे, अमित नवनाथ खिलारे ,सुमित नवनाथ खिलारे, समीक्षा नवनाथ खिलारे, नाईक नवरे परिवार, खिलारे परिवार, वाघमारे परिवार, खंडागळे परिवार, खिलारे तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता.सदर कार्यक्रमांच्य आयोजनासाठी अमित खिलारे यांनी अथक परिश्रम घेतले.

