‘महाज्योती’चा क्यूआर कोड बनला विद्यार्थ्यांच्या यशाची सुवर्णकिल्ली
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
ज्ञानाची दारे आता एका क्लिकवर उघडतात आणि स्वप्नांची उड्डाणे ‘महाज्योती’च्या स्कॅनर कोडमधून सुरू होतात असे चित्र आज राज्यभर दिसत आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) ही ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आज आशेचा दीपस्तंभ ठरली आहे.
विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याच्या हेतूने ‘महाज्योती’ने विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. ‘महाज्योती’च्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै 2024 रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले या स्कॅनर कोडवर तसेच https://mahajyoti.org.in/ schemes/ या संकेतस्थळावर एका कोटीहून अधिक भेटी झाल्या असून हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याने विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहाचे प्रतिबिंब उमटले आहे. अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, ‘महाज्योती’द्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग, पीएच.डी., स्किल डेव्हलपमेंट अशा विविध परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य पुरवले जाते. या उपक्रमामुळे आज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. मोबाईलच्या स्कॅनरने विद्यार्थ्यांना सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने 24 जुलै 2024 रोजी क्यूआर कोड स्कॅनर सुरू करण्यात आला. त्यानंतर फक्त 13 महिने 15 दिवसांत लाखो विद्यार्थ्यांनी या कोडद्वारे संकेतस्थळाला भेट दिली. ‘महाज्योती’चे संकेतस्थळ www.mahajyoti.org.in तसेच थेट https://mahajyoti.org.in/
आज या संकेतस्थळावरील भेटींची संख्या 1 कोटी 55 हजार 802 च्यावर पोहोचली आहे. मा. मिलिंद नारिंगे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे आणि विद्यावेतनाच्या पाठबळामुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून ‘महाज्योती’च्या योजनांची माहिती अधिक सुलभ झाली असून एका कोटींचा टप्पा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक विद्यार्थी आता ‘महाज्योती’च्या संकेतस्थळाला उत्सुकतेने भेट देतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केले आहे.

