पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
डॉक्टर सुपेकर क्लिनिक मुळे कोथरूड चांदणी चौक भुसारी कॉलनी या परिसरातील लोकांची गैरसोय दूर होऊन चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा मिळतील असा विश्वास पुणे येथील प्रसिद्ध औषध विक्रेते प्रदीप सुपेकर यांनी काढले. डॉ. स्वप्ना राजेश्वर सुपेकर यांच्या फॅमिली केअर क्लिनिक चे उद्घाटन पुणे येथील प्रसिध्द औषध विक्रेते प्रदीप सुपेकर व सातारा जिल्हा शिंपी समाज जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.हे क्लिनिक सुरू झाल्या मुळे कोथरूड, चांदणी चौक, भुसारी कॉलनी परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
या प्रसंगी साताराचे माजी सिव्हिल सर्जन डॉ. गढीकर, सौ. डॉ. गढीकर, सौ. स्मिता सुपेकर, सौ. सुवर्णा पोरे, शिवाजी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व आभार डॉ. राजेश्वर सुपेकर यांनी मानले.