पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या आदेशानुसार पंढरपूर येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले असून, नागरिकांनी व पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर यांनी केले आहे.
सदर लोकअदालतीत मध्ये पंढरपूर येथील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी दावे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस अॅक्ट च्या कलम १३८ खाली दाखल झालेली, दाखलपूर्व प्रकरणे, वैवाहीक वाद, भूसंपादन बाबतची प्रकरणे, अपघात न्यायाधीकरणाबाबतची प्रकरणे, तडजोडपत्र फौजदारी खटले तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण, भारत संचार निगम, बँका, पतसंस्था यांचे प्रकरणासह ठेवण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतचा नागरिकांनी पक्षकारांनी आपले प्रलंबित असलेले व दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविणे कामी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर यांचे मार्फत करण्यात आले आहे.