पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘सेवा भारती’ च्या वतीने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे प्रशिक्षण स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)तील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात केंव्हाही काहीही घडू शकते, हे नाकारता येत नाही. यासाठी स्वतःचा व समाजातील घटकांचा बचाव करणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण नेहमी तत्पर असणे गरजेचे आहे. या दृष्टीने ‘आपत्ती व्यवस्थापन’ यावर एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. स्वेरीतील विद्यार्थ्यांनी आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी बचाव कार्य पद्धती, प्राथमिक उपचार तसेच जनजागृती उपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ‘सेवा भारती’ चे श्रीकृष्ण पाटील व प्रमोद मोरे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आपत्तीच्या प्रसंगी कार्यक्षमतेने मदत करण्याच्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवाभारतीचे पदाधिकारी, स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे, डॉ. सौ. नीता कुलकर्णी, प्रा. चेतन लिमकर, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. बाळासाहेब गडदे, प्रा.गिरीश फलमारी, इतर प्राध्यापक वर्ग तसेच मार्गदर्शक, सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे या प्रशिक्षणात मोलाचे योगदान लाभले.