संग्रहित फोटो
खडकी प्रतिनिधी तेज न्यूज
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये राजमोहन चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. चौकात दोन क्लिनिक सहित अनेक मेडिकल स्टोअर असून काही जीर्ण झालेल्या इमारती आहेत. दहीहंडी निमित्त लावण्यात येणाऱ्या स्पीकरच्या भिंती मुळे इमारती ढासळण्याचा धोका निर्माण झाला असून बोर्ड प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दहीहंडी निमित्त या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
गोपाळकाला निमित्त खडकी परिसरात अनेक दहीहंडाचे आयोजन करण्यात येते. दहीहंडी निमित्त मोठमोठे स्पीकरच्या भिंतीच्या भिंती लावण्यात येतात. स्पीकरच्या आवाजाचा दणदणाटावर कोणताही अंकुश प्रशासन ठेवत नाही. दहीहंडी बघण्यासाठी बघणाऱ्यांची देखील मोठ्या गर्दी उसळते.
राजमोहन चौक (गोपी चौक) मध्ये देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी चौकामध्येच २ क्लिनिक आहेत तसेच अनेक मेडिकल स्टोअर देखील आहेत. या परिसरामध्ये अनेक जुन्या झालेल्या इमारती असून त्यांची जीर्ण अवस्था आहे. या चौकात घनदाट लोकवस्तीची आहे.
स्पीकरच्या मोठ्या भिंती लावण्यात येत असल्याने नवजात शिशु, विद्यार्थी, महिला तसेच जेष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ येते, साऊंडचा दणदणात दुपार पासून टेस्टिंगच्या नावाखाली सुरु ठेवण्यात येतो. साउंडच्या दणदणाटामुळे या ठिकाणी इमारती ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. बोर्ड प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या याबाबत गांभीर्याने विचार करून राजमोहन चौकामध्ये दहीहंडी साठी कोणतेही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.