सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पोलीस बॉईज असोसिएशन महिला सोलापूर जिल्हा,शहर विधी आघाडी, डॉक्टर आघाडी, व शिक्षक आघाडी निवड झालेल्या पदाधिकारी यांना प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक गौरीताई आमडेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व नॅपकीन बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक गौरीताई आमडेकर यांचा प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या हस्ते शाल व नॅपकीन बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष संध्या काळे जिल्हा कार्याध्यक्ष क्षितिजा गाताडे जिल्हा उपाध्यक्ष कल्पना बेडगनूर जिल्हा सचिव संगिता कारभारी सोलापूर शहर शहर अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे शहर कार्याध्यक्ष श्रीदेवी यळमेली शहर उपाध्यक्ष राजश्री पाटील डॉक्टर आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ संस्कृती वळसंगकर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ निलोफर शेख सोलापूर शहर अध्यक्ष. डॉ. अश्विनी वांगीकर विधी आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड मानसी कुलकर्णी सोलापूर शहर अध्यक्ष. ॲड अनुराधा येगडे शिक्षक आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा अर्चिता धरणे जिल्हा कार्याध्यक्ष . भारती कोळी सोलापूर शहर अध्यक्ष राजश्री तडकासे कार्याध्यक्ष . शिवलिला भोगडे उद्योग आघाडी सोलापूर जिल्हा व शहर अध्यक्ष प्रांजली हिंगे युवती आघाडी जिल्हा अध्यक्ष . वर्षा अतनूरे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार विजयश्री गुळवे वरील सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक रवि भाऊ वैद्य, प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक गौरीताई आमडेकर या सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.