मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
घाटकोपरच्या पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मराठी सण, संस्कृती व परंपरा जपण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद फाटक व संस्थेचे इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहकार्याने अनेक उपक्रम दरवर्षी शाळेमध्ये आयोजित केले जातात.
सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा आज दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वतीने कृष्णजन्मोत्सव व दहिहंडी हे उत्सव एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आले.
आज इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांतील अनेक मुली-मुले राधा- कृष्ण यांच्या वेषात उपस्थित होते. आज कृष्णजन्मोत्सव व दहीहंडी अशा दोन्ही सणांबद्दल सर्व वर्गातून माहिती सांगण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्रित हे सण साजरे केले.
त्याचप्रमाणे भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त "घरोघरी तिरंगा" हा उपक्रमही यानिमित्ताने आज साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रवींद्र बडवे व समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते.