पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करण्याच्या उद्देशाने, सोलापूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 'जनता दरबार' आयोजित करण्यात येणार आहे. हा दरबार दुपारी २:०० वाजता उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र कार्यालय, उजनी वसाहत, सोलापूर येथे होणार आहे तरी नागरिकांनी या अनुषंगाने आपल्या तक्रारी द्याव्यात असे आव्हान वैद्य मापन शास्त्र अधिकारी अ. ध. गटमी यांनी केले आहे.
या उपक्रमात माहितीचा प्रचार, जनजागृती, हितधारकांचा सहभाग, तक्रारींची नोंद व कार्यवाही यांचा समावेश असेल. वैधमापन शास्त्र अधिनियम तसेच आवेष्टीत वस्तू कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्राहक व जनतेच्या तक्रारी ऐकल्या जातील.
फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार असल्यास तीही मांडता येईल. सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक, पॅकर, आयातदार, किरकोळ विक्रेते, वजन व मापे परवानाधारक उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांनी उपस्थित राहून यंत्रणेच्या कामकाजाविषयी सूचना व अभिप्राय द्यावा, असे आवाहन उपनियंत्रक वैधमापन शास्त्र अधिकारी अ.ध. गेटमे यांनी केले आहे.