'मनातलं माझ्या...' या कवितासंग्रहातील कविता म्हंणजे सप्तरंगांची उधळणच.सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.सुर्यकांत नामगुडे यांचे प्रतिपादन
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
नवोदित कवियत्री आरती गोरख सोनवने-गलांडे यांच्या 'माझ्या मनातलं...' या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे प्रेम,भक्ती, अध्यात्म,निसर्ग, वास्तव, कल्पना आणि भावना अशा सप्तरंगांची उधळण करणाऱ्या व आशयघन अशा आहेत,असे प्रतिपादन करतानांच या नवोदित कवीचें खरेच स्वागत केले पाहिजे कि यांचेत एवढी ऊर्जा व प्रतिभा भरलेली आहे अशा शब्दात सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. सुर्यकांत नामुगडे यांनी कवियत्री आरती सोनवने यांचे कौतुक केले.
पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत राजकुमार काळभोर यांचे नावाने आयोजीत ४ थ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपिठावर कोपरगाव येथील कवियत्री सौ. आरती गोरख सोनवने- गलांडे यांचा 'मनातलं माझ्या....' या कवितासंग्रहाचे उत्साहात प्रकाशन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन या ४ थ्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामगुडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे,कवी किशोर टिळेकर, शुभांगी काळभोर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, सरचिटणीस सुनील लोणकर, उपाध्यक्ष डॉ.हनुमंत चिकणे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व साहित्य परिषद पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, मुख्य संयोजक तथा सचिव अमोल कुंभार आदी मान्यवराचें हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करतानां कवियत्री आरती सोनवने म्हणाल्या कि लहानपणापासुन विविध भाव-भावनाचां कल्लोळ व विविधरंगी विचाराची आवर्तन मनात सुरु असायची.आज प्रकाशनानंतर मातेच्या प्रसववेदना कळाल्या व माता झाल्याचे सुखही अनुभवता आले.
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सौ.आरती सोनवने यांना शुभेच्छा देतानां त्या एक उदयोन्मुख, प्रतिभाशाली कवियत्री आहेत व भविष्यात त्यांचे कडुन आधिकाधिक साहित्य सेवा घडेल अशी आशा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक मान्यवरानीं त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले.