गणेश वंदन
प्रथम तुला वंदिते गणेशा प्रत्येक कार्याची सुरवात तुलाच स्मरून करिते श्री गणेशा ||
अनाथाचा तु नाथ | सर्वांना देतो तु साथ| रूप तुझ मनमोहक |स्वरूप तुझ व्यापक||
एकंदता त्रिनयना विघ्नहर्ता प्रार्थना करते तुजला सदबुद्धी दे सर्वांना श्री गणेशा ॥
सद्विचार दे गणेशा सर्वांना अन हे विचार जागण्याची ताकदही गणेशा जास्त काही मागण नाही सर्वांना सुखी ठेव ही अपेक्षा
निष्काम श्रीसेवा दास्यभक्ती फक्त नको वदवून घेऊ श्री गणेशा || तर मला यामध्ये जागवा देवा निस्वार्थ सद्भावना यावी हीच प्रार्थना श्री गणेशा ||
वंदिते प्रथम तुला तु बुद्धिदाता विघ्नहर्ता तु अवघ्या जगाचा चालक तु अवघ्या जगाचा मालक
वंदिते एकदंता त्रिनयना श्री गणेशा ||
कविता - पूजा आशा दिलीप पाटील