डोंबिवली प्रतिनिधी जान्हवी माळवदे
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळा डोंबिवली येथे ३ ऑगस्ट २०२५ रोजी शुभमंगल कार्यालयात सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नामदेवांन अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरवात नामदेव महाराजांची पूजा आरास, सजावटनी करण्यात आली.मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुश्राव्य भजन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. ६५ ते ८५ वयाचे जेष्ठ नागरिक सुद्धा तरुण पिढीबरोबर भजन कीर्तन आणि अभंगात तलीन होऊन नाचत होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून स्थानिक आमदार राजेशजी मोरे(डोंबिवली ग्रामीण ) मा. नगरसेवक(क.डो.म. प.) व परिवहन सदस्य मनसे प्रल्हादजी म्हात्रे , डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेशजी पेणकर, सरचिटणीस, प्रकाशजी पवार, सरचिटणीस आशिष राजगौर व भाजप चे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब तसेच स्मिता माळवदे- मुख्याध्यापिका ल.पां, जगदाळे गुरुजी विद्यालय मालाड , शिक्षक व लोकप्रिय समाजसेवक गणेश हिरवे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा करण्यात आली. वय वर्ष ६५ पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकाचा सन्मान करण्यात आला.१०वी , १२ वी,१५वी, व इतर विशेष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.तसेच लग्नाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्याचे ही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला भरीव देणगी देऊन आर्थिक सहकार्य केलेल्या समाजबांधवाचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दिवंगत समाजबांधवना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. आलेल्या सर्व मान्यवरांनी नामदेव माहाराज यांचा इतिहास, त्यांचे कार्य, त्यांची भक्ती याविषयी माहिती दिली व समाज कल्याण वर मार्गदर्शन वर संभाषण केले.महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती हिरवे व मंडळाचे अध्यक्ष संदीप सलागरे यांनी अहवालवाचन , व समाजाची हातात असलेली कामे यावर समाजबांधवांना माहिती दिली.
शिंपी बिजनेस फोरम चे संस्थापक नरेंद्र बगाडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीं फोरम बद्दल कामकाजाबद्दल व आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी सर्वाना कशी मदत करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. एकमेका साह्य करू अवघे कसे श्रीमंत होऊ शकतो हे समजावून सांगितले.माहाराजांची आरती व महाप्रसाद आणि त्यानंतर आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स, कार्यकारी मंडळ, व समाजबांधवानी हातभार लावला.यावेळी जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांच्या वतीने नामदेव शिंपी समाज मंडळाला आदर्श संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे नीटनेटके आणि सुबक, अर्थपूर्ण सूत्रसंचालन जान्हवी माळवदे यांनी केले.