पुळुज प्रतिनिधी दत्ता पांढरे तेज न्यूज
उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट यामध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मौजे पुळुज ता.पंढरपूर येथे ४ ऑगस्ट वार सोमवार रोजी मा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इतापे, व मा. तहसीलदार पंढरपूर सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आले.
त्यामध्ये विविध प्रकारचे दाखले जसे रहिवासी, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलिअर दाखले, रेशन कार्ड, व इतर दाखल्याचे वाटप करण्यात आले. पुळुज येथील मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय पुळुज येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी यावेळी किसन जाधव, पांडुरंग ताटे, शाहीर मुलांणी,राजाराम बाबर, रतिलाल गावडे, मोहन खरात, मोहन गावडे, व पुळूज मंडळातील पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुळुज मंडळातील सर्व महा-ई-सेवा केंद्राचे चालक,मंडळ अधिकारी संतोष सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी गणेश तनमोर, चंद्रकांत मोटे ,गंगासागर चाळणेवाड, माहेश्वरी आटपाडकर, तसेच मंडळातील सर्व गावचे महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले.