पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय आयटी कंपनी कॅपजेमिनीमध्ये निवड होऊन आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाचा अभिमान वाढला असून विद्यार्थ्यांना वार्षिक ४.२५ ते ५.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर येथील हरिप्रिया नारायण कुलकर्णी, पंढरपूर येथील अनुष्का उत्तम कोठारे, गुरसाळे, ता.खटाव येथील अस्मिता संभाजी जाधव, माळेवाडी, अकलुज येथील धन्यता रघुनाथ फुले, सोलापूर येथील गायत्री मदन महाजन, शिवणे, ता.सांगोला येथील ईश्वरी औदूंबर नलवडे, पंढरपूर येथील ईश्वरी चारूदत्त ताठे, मंगळवेढा येथील समृध्दी संदीप कुलकर्णी, पंढरपूर येथील सानिका महेश मोहीकर, पटवर्धनकुरोली, ता.पंढरपूर येथील सानिका राजेंद्र कारंडे, पंढरपूर येथील उमामा नवोमन बेद्रेकर, पंढरपूर येथील सानिया रियाजअहमद अत्तार या विदयार्थ्यांची कॅपजेमीनी या कंपनीत निवड झालेली आहे.
कॅपजेमिनी ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली माहिती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवणारी कंपनी आहे. त्यांच्या प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये डिजिटल सेवा, क्लाउड, कन्सल्टिंग, आणि सॉफ्टवेअर विकास यांचा समावेश होतो. जगभरात ५० हून अधिक देशांमध्ये त्यांची उपस्थिती असून, भारतात देखील कॅपजेमिनी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण करत आहे.
सिंहगड महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे ही यशस्वी निवड शक्य झाली आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रोत्साहन वाढले असून, पुढील वर्षांमध्ये अधिकाधिक संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी कौशल्य, मेहनत आणि आत्मविश्वासाने या प्लेसमेंट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भविष्यातही त्यांना अशा संधी मिळत राहतील असे वक्तव्य महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले.
या निवडीसाठी विद्यार्थ्यांनी महाविदयालयाच्या ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’ च्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेतले होते. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.