सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यावर होत असलेली निसर्गाची अवकृपा व शेतमालाला मीळत नसलेला हमी भाव या मुळे शेतकरी अडचणीत असताना ..बहुतांश शेतकरी हा दुध व्यवसायाकडे वळलेला आहे.आपल्या कुटु़ंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुध व्यवसाय हा शेतकऱ्यापुढचा महत्वाचा पर्याय असल्याने दुध व्यवसायाकडे शेतकरी आकर्षीत झालेला असताना ..पशुपालकांना अपेक्षीत दुधाला दर सुध्दा मिळत नाही..एका गाईचा खर्च व ईतर गोष्टीचा विचार केला तर गाईच्या दुधाला किमान चाळीस रुपये प्रतिलीटर दर अपेक्षीत आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातुन आपले लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी दुध दर वाढी साठी अनेक आंदोलने केली आहेत..या अगोदरच्या सरकारला निवेदने दिली आहेत.स़मंधीत मंत्री महोदयांना प्रत्यक्षात भेटून दुध दर वाढीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शेतकरी पशुपालकाच्या भावना पोहचवल्या होत्या.
राज्यभर अनेकांनी दुध दर वाढीबाबत रास्ता रोको ,मोर्चे काढले होते तशाच प्रकारचे आंदोलन आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहरात केले गेले होते.त्या वेळेस राज्य सरकारने राज्यांतील आंदोलनाची दखल घेऊन दुध दर वाढीबाबत एक समीती नेमली व समीतीच्या अहवालाच्या आधारे दुध दर वाढ केली होती. परंतु ही दुध दर वाढ फसवी होती कारण त्या दर वाढीमागे जाचक अटी व नियम लावण्यात आले होते.त्यामुळे पशुपालक अर्थीक अडचणीत सापडलेला होता त्यांना अपेक्षीत दर मिळत नव्हता असे आसताना..
सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात व कालच्या पावसाळी अधिवेशनात दुध दर वाढीचा विषय मांडून दुध दरवाढ करणे कसे गरजेचे आहे हे निदर्शनास आणुन दिले होते. या बाबींचा विचार करुन राज्य सरकारने कालच गाईच्या दुधाला एक रुपयाची दर वाढ केलेली आहे..गाईच्या दुधाला प्रतिलीटर ३२ रुपये असलेला दर ३३ रुपये झाला असुन पशुपालक शेतकऱ्यांना काही प्रमाणात या दर वाढीमुळे दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काळात आणखीन दुध दर वाढीबाबत आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष प्रयत्न करणार असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.