हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मशताब्दी निमित्त आयोजन
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी (पंढरपूर)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषिदुत धनेश कणमुसे, आकाश पाटील, दयानंद बिदरी, आनंद जमादार, प्रशांत जाधव, किरण माळी, विनायक कोटगी व करण लोखंडे यांच्याकडून भाळवणी येथे भारतरत्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिवस आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शाश्वत शेतीचे महत्त्व, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची गरज, पाण्याचे व्यवस्थापन, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी दूतांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व शेतकऱ्यांशी संवाद याच्या माध्यमातून शेतीसंबंधित माहिती दिली.
या कार्यक्रम प्रसंगी भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी डी. एस. वाघमारे, कृषी सहाय्यक अधिकारी सागर गव्हाणे, पशुधन विकास अधिकारी पी. एस.खंडागळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी.नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर, व कार्यक्रम अधिकारी प्रा.एच. व्हि. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांचा देखील या कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम चांगल्या रित्या सुरळीत पार पडले.