पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे प्रतिनिधित्व करणारी सक्रिय संघटना आहे. संघटनेच्या विस्तार आणि बळकटीसाठी प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील व प्रदेश सचिव विशाल लांडगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सतिश भुई (ग्रामपंचायत पिराची कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत आहे.
सतिश भुई यांनी ग्रामपातळीवरील विकासकामांमध्ये सातत्याने सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची आणि कार्यकुशलतेची दखल घेऊन, प्रदेश पातळीवरील मुख्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची ही निवड केली आहे.
🔹 संघटनेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व सदस्यांना सक्षम बनवणे
▪️ शासकीय योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहोचवणे
▪️ सीएसआर फंडाद्वारे ग्रामपंचायतींना सहकार्य करणे
▪️ गाव दत्तक योजना, शाश्वत विकास, प्रशिक्षण व मार्गदर्शन
▪️ राज्यभर संघटना विस्तार व संघटनात्मक बांधणी करणे करता कर्तव्य पार पाडतील
सतिश भुई हे राज्यशास्त्र विषयाचे पदवीधर असून त्यांनी MBA पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ निश्चितच राज्यभरात संघटना बळकट करण्यास होणार आहे.
या नियुक्तीबाबत आपले विचार व्यक्त करताना अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील म्हणाले: “सतीश भुई यांचा अनुभव व दृष्टिकोन संघटनेच्या कार्याला नवी दिशा देईल. ग्रामपातळीवर संघटना पोहोचवण्याचे व सशक्त करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे होईल, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदेश सचिव मा. विशाल लांडगे पाटील यांनी केले. त्यांनी म्हटले की, “सतिश भुई यांच्या रूपाने संघटनेला अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे.”