आपण अखेर च्या श्वासापर्यंत ठाकरे सोबत राहणार.. अस्मिता गायकवाड यांचा निर्धार
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
अस्मिता गायकवाड या गेली तीन दशके पक्ष संघटनेत प्रचंड निष्ठेने काम करीत आहेत. अनेक माणसं त्यांनी जोडली . महिला चे उत्तम संघटन केले. त्याची अभ्यासू वृत्ती , पक्ष वाढीसाठीचे कठोर परिश्रम घेण्याची तयारी ओळखूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचेवर उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे.पक्ष अडचणीतून मार्गस्थ होत असताना आपण खंबीर साथ देण्याची गरज आहे. जनता परिवर्तनासाठी एकवटत आहे. अशा स्थितीत आपण अस्मिता गायकवाड यांच्या पाठीशी उभे रहा त्यांना विधानसभेत पाठवा .त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. आशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अस्मिता गायकवाड यांचे कौतुक केले.
ते प्रबोधन सेना व महिला आघाडी सह शिवसेना अंगीकृत संघटनानी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान तसेच उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ म्हणाले की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा महापालिकेवर फडकाविण्यासाठी सज्ज व्हा. परिस्थिती अनुकूल आहे . त्याचा फायदा घ्या.व सर्वात जास्त नगरसेवक महापालिकेत पाठवा असे आव्हान केले, महाराष्ट्र राज्य संघटक उद्धव कदम यांनी अस्मिता गायकवाड यांना उदंड आयुष्य व शक्ती मिळो अशा शुभकामना दिल्या.उपनेते शरद कोळी यांनी देखील अस्मिता गायकवाड यांच्या निरंतर कार्याचा गौरव केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अस्मिता गायकवाड म्हणाल्या की, गेली ३० वर्षे सामाजिक कार्यात सर्वांनी साथ दिली.जनहिताची कामे करण्यासाठी प्रेरणा दिली. शिवसेना पक्षस़घटन, मनोरमा बॅन्क, अस्मिता व्हीजन न्यूज चॅनल, कौटुंबिक सल्ला समुपदेशन केंद्र तसेच कृषी पर्यटन यांच्या माध्यमातून जनहिताचे काम करता आले. आपण अखेरच्या श्वासापर्यंत मातोश्री च्या विचार सारणीशी व ठाकरे परिवाराशी प्रामाणिक राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी जि.प.सोलापुर चे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, जनसेवक ॲड . जयंत शिंदे,१२ वी परिक्षेत पहिली आलेली ऐश्वर्या अंबलगी , समाजसेवक धोंडिबा नारायणकर ,व नागपूर महानगरपालिकेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेले शिवम अल्ली यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक उध्दव कदम, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, दत्ता माने, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, तसेच मनोरमा मल्टीस्टेट च्या चेअरमन शोभा श्रीकांत मोरे, कविता कुलकर्णी , अरूधती नायडु, कमलाकर पुजारी, पुरूषोत्तम साखरे शिवशंकर सावंत, डॉक्टर प्रसन्न गव्हाणे, प्राध्यापक विक्रम कारंडे, संजय अलकुंटे, लोकसभा क्षेत्र प्रमुख शशिकला चिवडशेट्टी, जिल्हा संघटक प्रिया बसवंती, शहर संघटक प्रिती नायर, स्वाती रूपनर , जोहरा रंगरेज,मिनार सुरवसे, जयश्री पिटील, सुमित्रा देसाई, छाया वायदंडे, राजश्री उमराणी,सुरेश जगताप, लहु गायकवाड,संजय साळुंखे,अनिल कोंडुर,रेणुका अलकुंटे, पौर्णिमा मिसालेलु,ललिता वाडे, महेश ठाकरे, जयंत कदम, ॲड.मल्लीनाथ पाटील, ॲड.अशोक जालादी, ॲड.दादासाहेब जाधव, ॲड.युवराज आवताडे, ॲड.राहुल गायकवाड, ॲड.सुनिल क्षीरसागर ॲड करण भोसले ॲड दिपा भोसले शिवाजी कोळी, भास्कर पाटील, संतोष पवार, दयानंद बादगुडे , प्रा.एस.आर.पाटील, प्रा.प्रशांत शिंपी, प्रभाकर हाळदे,अशोक ठोंगे-पाटील, अमोगसिध्द माने, चवरे, रामचंद्र पाटील प्रा.कृष्णात देवकर, छत्रपती केने ,टी.ए.जाधव , अर्जुन सपाटे सर, गजेंद्र माशाळ, प्रशांत कदम,साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे , निवृत्ती गुंड, मुजाहिद दारूवाला, प्रभाकर यादगिरी,बबलु बागवान, प्रशांत माने,भारत गुंड, आदी उपस्थित होते आभार ॲड.सुरेश गायकवाड यांनी मानले तर नेटके सुत्र संचालन दशरथ वडतिले व वृत्त निवेदिका पल्लवी पवार हिने केले.
विषेश म्हणजे सामानाच्या संपादिका रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे , धाराशिव चे खा. ओमदादा निंबाळकर व मनोरमा चे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी देखील मोबाईल वरून संभाषण साधत शुभेच्छा दिल्या.यावेळी सप्तरंग निर्मित प्रा. अनिल लोंढे यांच्या बहारदार गिताचा कार्यक्रम झाला त्याला सर्वांनीच भरभरून दाद दिली .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, बाळासाहेब गायकवाड, सुरेश काळंगे, परीस गायकवाड विश्वास शिंदे,,विराज गायकवाड ऋषिकेश गायकवाड, योगीराज चिवडशेट्टी, नागेश शिरूर,संजय अलकुंटे, जयंत कदम, शिवाजी कोळी राहुल सावंत, उमेश कलशेट्टी, महावीर परदेशी आदींनी परिश्रम घेतले.