पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र जरी दिसले तरीही महाराष्ट्र राज्यातील जनतेत एक अद्वितीय स्फुरण निर्माण होते,पंढरपूर तालुक्यातील होळे गावात अजब गोष्ट घडली आहे,
चक्क ३६२ किल्ले जिंकणाऱ्या त्या राजाच्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील होळेगावात एका झाडाला राजे छत्रपती शिवरायांची प्रतिकृती निर्माण झाल्यासारखे दिसत आहे. महाराजांचा
अर्ध पुतळा दिसत आहे असून तो पाहण्यासाठी गर्दी निर्माण झाली आहे जणू काही निसर्गाला सुद्धा माझ्या राजाचा गर्व असल्यासारखा वाटत आहे स्वराज्यासाठी रयतेसाठी गवताची काडी गहाण न टाकणारा राजा त्याच वृक्षाच्या रूपाने माझ्या राजाचा जन्म झाल्या सारखा वाटत आहे.
अशीच भावना होळे ग्रामस्थांची आहे.माझे राजे आज अस्तित्वात जरी नसले तर ते ह्या निसर्गात पुन्हा पुन्हा जन्म घेतल्यासारखे वाटत आहेत खरीच आश्चर्याची गोष्ट झाली आहे .
व्रतवैकल्याचा पवित्र श्रावण महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिक प्रतिकृती पाहून लोक धन्य होत आहेत