वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
बोर्डो पेस्ट ही एक पारंपरिक आणि परिणामकारक जैविक बुरशीनाशक आहे जी मुख्यतः फळझाडांच्या खोडावर लावली जाते. ही पेस्ट तांब्याचा सल्फेट आणि चुन्याच्या मिश्रणापासून तयार केली जाते. झाडांवर ही पेस्ट लावल्याने बुरशीजन्य रोगांपासून झाडांचे संरक्षण होते, जसे की खोड कुज, फळ गळ आणि इतर बुरशीमुळे होणारे रोग. ही पेस्ट झाडाच्या छाटणीनंतर झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे झाड निरोगी राहते व त्याचे उत्पादनक्षमता आणि आयुष्य वाढते. ही पेस्ट पर्यावरणास हानिकारक न असून नैसर्गिक पद्धतीने रोग नियंत्रणात मदत करते. डाळिंब, आंबा, द्राक्ष, लिंबू, संत्रा अशा विविध फळझाडांमध्ये बोर्डो पेस्टचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे झाडांची वाढ सुरळीत होते आणि उत्पन्नात वाढ होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य . आर जी. नलवडे,प्रा. एस.एम.एकतपुरे कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. एम एम चंदनकर कार्यक्रम अधिकारी एच व्ही कल्याणी व विषयतज्ज्ञ डॉ. डी.एस.ठवरे यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्या श्रुती पाटोळे भोईटे योगिता, जगदाळे सानिका , शिखरे प्रतीक्षा ,कहाकर साक्षी ,रेड्डी रोहिणी,देशमुख प्रणोती ,घुले तनुजा , वैशाली खिलारे यांनी महत्त्व पटावून दिले