पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उजनी आणि वीर धरणांमधून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामुळे भिमा नदीला पूर आल्याने पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे केळी ऊस व इतर फळ शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन त्यानां मदत मिळावी अशी सुचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी महसुल विभागाकडे केली तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
यावेळी कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन बापू नागटिळक,परमेश्वर तात्या लामकाने, अरुण भोई, बिभीषण दाजी पवार, विश्वास उपासे, समाधान उपासे,यशवंतराव चव्हाण पतसंस्थंचे चेअरमन शहाजी साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक,सिताराम महाराज साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तम काका नाईक नवरे, विकास नागटिळक, पांडुरंग कौलगे, रामभाऊ कौलगे, सरपंच तुकाराम माने, सरपंच सोमनाथ झांबरे,गणेश शिंदे, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर झांबरे, दत्तात्रय झांबरे, सरपंच संजय देवळे,बंडू पवार,विकास पवार,सदाशिव पवार, पांडुरंग पवार,अनंता घालमे, ज्ञानेश्वर नागटिळक, श्री नागटिळक,गोरख चव्हाण शरद पवार उपस्थित होते.
उजनी आणि वीर धरणांमधून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिक, त्याचबरोबर फळबागा पाण्यात गेल्याने फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पिराची कुरोली गावातील भुई वस्ती येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. महसूल विभागाने नदीकाठच्या गावातील पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी पिराची कुरोली , वाडीकुरोली , शेळवे, खेडभोसे, खेडभाळवणी, होळे, देवडे, पटकुरोली, शिरढोण या गावात भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.