माळशिरस प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील दसूर गावामध्ये स्नेहल विक्रमसिंह नलवडे यांनी "खुशी ब्युटी पार्लर" या नव्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज उत्साहात संपन्न केला. या वेळी ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संचालिका – सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर (अकलूज) आणि शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील, मा. सरपंच – ग्रामपंचायत अकलूज, विशेष उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी स्नेहल नलवडे यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
"गावपातळीवर महिलांनी अशा प्रकारे उद्योगात पुढे येणे ही प्रेरणादायी गोष्ट असून, हे पाऊल इतर महिलांसाठी दिशादर्शक ठरेल," असे मत कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील व्यक्त केले.
उद्घाटनानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
सौ. स्नेहल नलवडे यांनी महिलांसाठी सौंदर्य सेवा गावातच उपलब्ध करून देत स्वबळावर उभं राहण्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या पावलामुळे गावात महिला उद्योजकतेला बळ मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार संधीही वाढतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.