अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
येथील सदाशिवराव माने विद्यालयात स्व. राजीव गांधी यांची जयंती ‘सदभावना दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदयालयाचे मुख्याध्यापक मा. अमोल फुले सर यांच्या हस्ते व उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयाच्या इयत्ता ८ वी फ या वर्गाने कार्यक्रमाचे सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यार्थी भाषणामध्ये कु.कार्तिकी पवार व चि. वेदांत जाधव यांनी स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त साजरा केल्या जाणाऱ्या सदभावना दिवसाचे महत्व सांगून त्यांच्या जीवनाविषयी बोलताना भारतातील सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून देशात संगणक, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेली प्रगती याविषयींची माहिती दिली तसेच देशात एकता,शांतता आणि सामाजिक ऐक्य यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा सलगर व कु. योगिता बेद्रे यांनी केले. सदभावना प्रतिज्ञेचे वाचन कु. मरियम तांबोळी हिने केले तर चि. मयुरेश लोहार याने अनुमोदन दिले. कार्यक्रम उत्कृष्ट पार पडल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कु.आरती शेंडगे हिने मानले.