खडकी प्रतिनिधी तेज न्यूज
खडकीतील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी खडकी पंचक्रोशीतील शाळांमधील ९५ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , प्रशस्तिपत्रक व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवरलाल जैन, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे मा.संचालक व उद्योगपती विवेक शिंदे , श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त नरेंद्र बागनाईक व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष क्रीडा पुरस्कार मानकरी सतीश राजहंस , मिथिलेश बाडोलीया, सचिन शिराळे या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले, खडकी व देशाचे नाव वाढविले असल्यामुळे तिघांना विशेष क्रीडा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विवेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व श्रीराम मंदिर देवस्थान हि धार्मिक संस्था असून देखील अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असल्यामुळे ट्रस्टचे विशेष कौतुक केले. ह.भ.प वैभव वारके यांच्या सूत्र संचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. त्यांनी विद्यार्थी जीवन कसे असावे याचा गाभा सांगितला.
या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी घेतलेली मर्यादेची शपथ. आई वडिलांचा मान, देव देश धर्माचा अभिमान , सत्याची कास व राष्ट्रहित या मूल्यांवर कायम पुढे जाण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. सत्कार सोहळ्या नंतर निवडक विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मंदिरात उपस्थित होते शेवटी प्रभूश्रीराम यांच्या महाआरतीने वातावरण मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नरेंद्र बागनाईक विश्वस्त प्रशांत पृथ्वीराज, मिलिंद पोत्रे , सचिव संजय टेकाडे खजिनदार स्नेहल पृथ्वीराज, दत्तात्रय मसेकर, अनिकेत अय्यावार, शैलेश फुलेल्लू, प्रवीण अय्यावार, सर्वजीत बागनाईक व रेणुका पृथ्वीराज यांनी विशेष परिश्रम घेतले.