वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
त्रिमूर्ती नगर मित्र परिवार,त्रिमूर्ती गार्डन मित्र परिवार आणि न्यू नवदुर्गा उत्सव समिती त्रिमूर्ती नगर,वॉर्ड नंबर 3, उमरी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती उद्यान, त्रिमूर्ती नगर, वॉर्ड नंबर 3, उमरी मेघे, वर्धा येथे " भव्य तान्हा पोळा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.परिसरातील ९३ बालगोपालांनी नंदी सजावट करून आपल्या परिवारासह उपस्थिती दर्शविली होती.
तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी सर्व बालगोपालांना चॉकलेट,फ्रूट ड्रिंक्स, exam pad देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले आणि उपस्थित सर्व नागरिकांना गोपाळकाला व प्रसाद देऊन त्यांचे उपस्थिती बद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा.सचिनभाऊ खोसे,माजी सरपंच ,ग्रामपंचायत उमरी मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.सचिनभाऊ खोसे,प्रशांतभाऊ खंडार, चेतन गदरे,त्रिमूर्ती नगर मित्र परिवार, त्रिमूर्ती उद्यान मित्र परिवार आणि न्यू नवदुर्गा उत्सव समिती, त्रिमूर्ती नगर वॉर्ड नंबर 3, उमरी मेघे, वर्धा या सर्वांचे सहकार्य लाभले.