रोशन शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात देशाची प्रगती साधण्यासाठी विद्याशक्ती,युवाशक्ती,व जनशक्ती एकत्र येण्याची गरज आहे. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची ताकद फक्त युवकांमध्येचआहे अशावेळी स्वार्थ, द्वेष, मत्सर, हेवेदावे सोडून,नितीमत्ता ,मानवता धर्म समोर ठेवून देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवण्याची जबाबदारी युवकांचीं आहे असे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर लायन्स रिजन चेअरमन लायन ॲड श्रीनिवास कटकूर, सचिव लायन दीनानाथ धुळम, माजी अध्यक्ष लायन भावेश शहा,उपाध्यक्ष लायन केदार स्वन्ने, रोशन शिक्षण संकुलाचे प्राचार्य बी जे इंगळगी,उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.ए के बांगी ,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी मळळी यांनी केले. यावेळी उपस्थित अतिथी मान्यवरांचे स्वागत पर यथोचित सत्कार शिक्षण संकुलाचे प्राचार्य माननीय श्री बी जे इंगळगी यांच्या हस्ते करण्यात आले. रोशन शिक्षण संकुलाचे उपक्रमशील प्राचार्य बी जे इंगळगी यांच्या मार्गदर्शनाखाली 79 वा स्वातंत्र्य दिन थाटात साजरा करण्यात आला. लायन्स पदाधिकाऱ्यांच्या अमृतहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ॲड.ला.श्रीनिवास कटकुर,ला प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या अमृतहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त शिक्षण संकुलाच्या वतीने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आर एस पी व स्काऊट गाईड चे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालन सादर करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांना मानवंदना दिले.ए मेरे वतन के लोगो, हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकले. यावेळी विद्यार्थ्याची भाषणे झाली.रिजन चेअरमन ॲड.श्रीनिवास कटकुर यांनी आपल्या भाषणातून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी त्याग बलिदान केलेल्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा आपल्या भाषणातून व्यक्त केले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना लेखणी व गोड खाऊ दिले.प्रमुख पाहुण्यांच्यां हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतावर आधारित विविधतेत एकता देशभक्ती विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून उपस्थित पालक व मान्यवरांचे मने जिंकले.
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रोशन शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए मुलाणी सर केले. आभार व्ही जी कटारे मॅडम यांनी केले