सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
कै.के.बी.मोरे मोफत वाचनालय. पेठ शिवापूर मोरगिरी येथे या ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांचे योगदान भारतीय ग्रंथालय चळवळीसाठी व समृद्ध ग्रंथालय वैचारिक वैभववाची साक्ष देत असतात या पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे ग्रंथालय सुरू करण्यामागे यांचा त्याग व कष्ट करून भावी पिढीला त्याचा वाचन संस्कृतीमुळे उपयोग होणार आहे.
हे त्यावेळी त्यांनी जाणले असल्यामुळे या वाचनालयांना सरकारी किंवा शासनाचे पाठबळ असणे गरजेचे असून ग्रामीण भागात ही वाचनालय चांगली चालवण्यासाठी जाणकार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असून भावी पिढी तरुण मुले मुली यांनी या ग्रंथालय चळवळीच्या निमित्ताने योगदान देणे गरजेचे आहे दि..9 ऑगस्ट त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण राज्यात व देशात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. भारत देशाला समृद्धीसाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती राष्ट्रीय च नव्हे परंतु आज आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून. अवघे जीवन वेचून ग्रंथ समृद्धीसाठी अपार मेहनत व कष्ट घेतले त्यामुळेच आपण त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत. डॉ .कासार यांच्या शुभहस्ते त्यांच्या फोटो पूजन व पुष्प माला व श्रीफळ वाढवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आमचे मार्गदर्शक संजय इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली प्रगतीचा आलेख वाढत आहे. कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिकांत प्रभाळे. संस्थापक मार्गदर्शक संजय हिरवे. बापू फुटाणे. गजानन मोहाळकर .पांडुरंग दुर्गवडे , पांडुरंग नथुराम साळुंखे प्रकाश शिंदे. ग्रंथपाल प्रार्थना हिरव.व असे जेष्ठ लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याविषयी माहिती संजय हिरवे यांनी दिली. अशी पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला!