मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
लालबागचा राजाच्या इथे गणेशोत्सवाच्या दहा दिवसात अवयवदान देहदान जनजागृती आणि रजिस्ट्रेशन साठी खास टेबल ठेवण्यात येणार असून ज्या लोकांना अवयवदान देहदानासाठी नावनोंदणी करायची आहे ते गणेशभक्त या ठिकाणी नावनोंदणी करू शकतात आणि यासाठी मंडपाजवळ दहा दिवस एका खास टेबलाचे आयोजन करण्यात येणार आहे.आजही अनेक नागरिकांना अवयवदान देहदान यांबद्दल पुरेशी माहिती नसल्याने किंवा म्हणावे तेवढे ते लोक जागरूक नसल्याने मनात इच्छा असून देखील अवयवदाना पासून वंचित राहतात.खरतर सध्या अनेक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत असून त्यांना वेळेवर अवयव उपलब्ध होत नसल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत.अवयवदान करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या नातेवाईकांच्या होकारानुसार ना हरकत प्रमाणपत्र घेऊन फॉर्म भरायचा असतो.फक्त ब्रेन डेड परिस्थितीतच अवयव घेतले जातात.नैसर्गिक मृत्यूत आपण त्वचा आणि डोळे दान करू शकतो. लालबाग च्या राजाने अवयवदान जनजागृती आणि नावनोंदणी साठी केलेली व्यवस्था कोणतेही गणपती मंडळ अथवा नवरात्रोत्सव मंडळ आपल्या ठिकाणी करू शकते.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व