भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री अकॅडमी येथे सेवानिवृत्त प्राध्यापक शशिकांत देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन डॉ. नवनाथ खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच भारतीय जनता पार्टी अंतर्गत पदवीधर प्रकोष्ठच्या वतीने हर घर तिरंगा अभियान तसेच सोलापूर जिल्हा नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक (मालक), आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे , असिस्टंट रजिस्टर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महेंद्र कोठावदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडा, वही, पेन व खाऊचे वाटप आयोजित करण्यात आले .
या कार्यक्रमास उपसरपंच नितीन शिंदे, मनोहर माने ,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे ,विश्वजीत देशमुख, सुनील मासाळ,किरण सदलगे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक यशश्री अकॅडमीचे संचालक प्रवीण लिंगडे यांनी केले तर आभार रणजितसिंह लोखंडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.